Friday, 18 Oct, 1.39 pm MPC News

अन्य बातम्या
Pimpri: शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अण्णा बनसोडे यांना विजयी करा - वैशाली काळभोर

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ काळभोरनगर आकुर्डी भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काळभोर बोलत होत्या. या पदयात्रेत आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे, स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, तसेच मुकुंद काळभोर, जक्कल काळभोर, आझम खान, मनीषा काळभोर, चिंटू दातीर-पाटील, सविता धुमाळ, किरण देशमुख, दीपाली देशमुख आदी सहभागी झाले होते.

यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, अण्णा बनसोडे यांनी आमदार असताना सातत्याने लोकांची कामे केली. पिंपरी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काळभोर यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top