Saturday, 14 Dec, 10.00 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri : वकिलाच्या मोटारीमधून 70 हजारांचा ऐवज लांबविला

एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या एका वकिलाच्या मोटारीतून अज्ञात चोरट्याने 40 हजारांची रोकड, घड्याळ, गॉगल असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.

अ‍ॅड. अक्षय नारायण कामत (वय 40, रा. भांडुप ईस्ट, मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अ‍ॅड. अक्षय कामत काही कामानिमित्त शुक्रवारी जुनी सांगवी येथे आले होते. त्यांनी सांगवीतील सार्वजनिक रस्त्यावर मोटार पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने मोटारीतील 40 हजारांची रोकड, 20 हजार रूपये किंमतीचे घड्याळ, 10 हजार रूपयांचा गॉगल असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. फौजदार विनोद शेंडकर तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top