Thursday, 26 Nov, 2.00 pm MPC News

पुणे
Pune Accident News : पोकलेन अंगावर पडल्याने कचरावेचक तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कचरा डेपोमधील पोकलेन खाली कोसळल्याने त्याच्या खाली येऊन कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे . ही घटना रामटेकडी परिसरातील कचरा डेपोत घडली आहे .

शाहबाज शेख ( वय २४, रा. हडपसर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोकलेन चालक रुपेश कुमार (वय २१, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी शाहबाज रामटेकडी इंडस्ट्रीज एरिया महानगरपालिका कचरा डेपोत कचरा वेचत होता. त्यावेळी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास रुपेश कचरा ढिगाऱ्यावर पोकलेन चालवित होता. रुपेशने उंच असलेल्या ढिगाऱ्यावर पोकलेन चढविल्यामुळे पोकलेन खाली पडला. त्यामुळे पोकलेनची बकेट लागून शाहबाज गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top