Sunday, 19 Jan, 4.59 pm MPC News

पुणे
Pune : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून पुण्यात बैठकांवर बैठका सुरूच; अधिकाऱ्यांची होतेय धावपळ

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवार यांनी पुण्यात बैठकांवर बैठका घेण्याचा पराक्रम सुरू केला आहे. पुणे महापालिका, पिंपरी - चिंचवड महापालिकेसह पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पवार यांनी अधिकाऱ्यांची 'पळता भुई' केली आहे.

मेट्रो, 'पीएमआरडीऐ', आशा अनेक मोठ्या प्रकल्पांचा ते सातत्याने आढावा घेत आहे. पुणे शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोला मागणी वाढली आहे. पण, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केवळ मेट्रो हा उपाय नाही. त्यासाठी 'पिएमपीपीएमएल' च्या बसेसही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावण्याची गरज आहे.

आगामी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार 'फिल्डिंग' लावणे सुरू केले आहे. पुणे शहरात भाजपची मोठी ताकद आहे. खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मानणारा भाजपमध्ये मोठा वर्ग आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल 98 नगरसेवक आहेत.

आगामी महापालिकेची निवडणूक वार्डपद्धतीने होणार असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना, मनसेला होणार असल्याचे बोलले जात आहे. तर, भाजपला तोटा होणार असल्याची चर्चा आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने 4 चा प्रभाग केला होता. 'मिनी आमदारकी' सारखी ही निवडणूक झाली. त्यातच मोदी लाट कायम असल्याने भाजपला फायदा झाला आणि 2017 मध्ये भाजपची एक हाती सत्ता आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top