Saturday, 24 Aug, 10.48 am MPC News

टॉप न्यूज
Pune : कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदांनी फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

एमपीसी न्यूज - गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदानी बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी सहा थर लावून फोडली. शनिवारी रात्री ०९ वाजून ०७ मिनीटांनी अवघ्या दुस-या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. चांदी की डाल पर… मच गया शोर… सारख्या गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला.

बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोल्हापूर, सांगली येथे उद्भविलेल्या पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोतवाल चावडी येथे साध्या पद्धतीने यंदा दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, अभिजीत कोद्रे, यतिश रासने, सचिन आखाडे यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. नटराज दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला सन्मानचिन्ह, गणेशाची प्रतिमा बक्षिस म्हणून देण्यात आली.

सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार १० कोटी रुपयांची मदत टप्याटप्याने पूरग्रस्तांना देण्यात येणार असून त्यामुळेच आम्ही देखील दहीहंडी उत्सवात देखावा व सजावटीचा खर्च टाळून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top