Tuesday, 04 Aug, 9.01 pm MPC News

पुणे
Pune : कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले ; 1312 रुग्णांची कोरोनावर मात, 1192 नवे रुग्ण, 28 मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आता कोरोनाच्या रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी तब्बल 1312 नागरिकांनी कोरोनावर मात केली. 1192 नवे रुग्ण आढळले. 28 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 656 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 404 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 59 हजार 496 रुग्ण झाले आहेत.

41 हजार 251 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 412 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 833 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाषाणमधील 72 वर्षीय पुरुषाचा, औंध रोडवरील 60 वर्षीय महिलेचा D. H. Aundh हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 64 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 71 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 46 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 65 वर्षीय पुरुषाचा, खैरेवाडीतील 76 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 59 वर्षीय महिलेचा, धायरीतील 30 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कात्रजमधील 65 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, वारजे - माळवाडीतील 73 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, कर्वेरोडवरील 72 वर्षीय महिलेचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा आणि 93 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 76 वर्षीय पुरुषाचा, बोपोडीतील 55 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 55 वर्षीय पुरुषाचा, गणेश पेठेतील 73 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 52 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धनकवडीतील 70 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 62 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, लोहगावमधील 65 वर्षीय पुरुषाचा विनोद मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, गोखलेनगरमधील 79 वर्षीय पुरुषाचा जोशी हॉस्पिटलमध्ये, पुणे स्टेशनवरील 70 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 66 वर्षीय पुरुषाचा, घोरपडी गावातील 64 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 68 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिंग होममध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top