Thursday, 17 Oct, 6.52 am MPC News

तळेगाव
Pune : 'मंत्री नंतर व्हा आधी आमदार म्हणून तर निवडून या!'

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचा विकास व्हावा, ही नागरिकांची किमान अपेक्षाही पूर्ण न केल्यामुळे विद्यमान आमदार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर मतदार चिडलेला आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिपदाचे स्वप्ने पाहण्यापूर्वी आधी आमदार म्हणून तर निवडून या, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी दिले.

देहूरोड शहर व परिसरातील गावांमध्ये सुनील शेळके यांची 'लाट' निर्माण झाल्याचे त्यांच्या पदयात्रांना मिळत असलेल्या उदंड प्रतिसादावरून दिसून येत आहे. शेळके यांनी आज (गुरुवारी) देहूरोडजवळील चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, काळोखेमळा, लक्ष्मीनगर, माळवाडी, बोडकेवाडी, विठठ्लवाडी येथील मतदारांच्या गाठीभेठी घेतल्या. सर्व गावांमध्ये शेकडो तरुण पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

शेळके म्हणाले की, मावळच्या जनतेला मंत्री नको आहे. त्यांना काम करणारा, त्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा आमदार हवा आहे. दहा वर्षांत त्यांनी तालुक्याची वाट लावली आहे. आपल्याला अनेक वर्षे प्रलंबित असलेला रेडझोनचा गंभीर प्रश्न सोडवायचा आहे. गेली दहा वर्षे या लोकांनी याबाबत पाठपुरावा करायला पाहिजे होता पण यांनी तसे केले नाही त्यामुळे आता त्यांना घरी बसवायचे आहे आणि त्यासाठी मला एकच संधी द्या तुम्ही इतरांना दोन- दोन संधी दिल्या, आता मला एकच संधी द्या.

देहू पालखी मार्गावर अनेक खड्डे पडले असून मार्गाची दुर्दशा झालेली आहे. या मार्गावर 400 हून अधिक खड्डे आहेत, याकडे शेळके यांनी लक्ष वेधले. देहूरोडचा उड्डाणपूल अर्धवट असताना श्रेय लाटण्यासाठी घाईघाईत उद्घाटन केले. आठ महिने झाले काम पडले बंद असून वाहतूक कोंडीने वाहनचालक दररोज हैराण आहेत. चिंचोलीत रस्त्याचे काम त्यांनी अडवले आहे. तो रस्ता मी करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मागील पाच वर्षांतील भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणीही शेळके यांनी केली.

ढोल-ताशांचा दणदणाट, रांगोळ्यांच्या पायघड्या, ठिकठिकाणी औक्षण करून होणारे स्वागत, अबाल- वृद्धांमध्ये सुनीलआण्णांना भेटण्याची ओढ, तेवढ्याच आत्मीयतेने ज्येष्ठांपुढे नम्रतेने झुकणारे, जवळ येणाऱ्या मुलांना प्रेमाने उचलून घेणारे आण्णा, तरुणांमध्ये जोश निर्माण करणारे आण्णा यातून सुनीलआण्णांची लाट स्पष्टपणे जाणवत होती.

चिंचोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्ष सविता जाधव तसेच योगीता सावंत,लता जाधव,सारिका गायकवाड, रामभाऊ पानसरे, नंदकुमार जाधव, श्रीरंग सावंत, पंडितराव जाधव, बाळासाहेब जाधव, निवृत्ती बालघरे, रामभाऊ सावंत, दिलीप पानसरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते.

किन्हईत बाळूअण्णा पिंजण, वैभव पिंजण, कुमार कांबळे, अमित पिंजण, सोमनाथ पिंजण, बाळू पिंजण, बाळू शुभाष पिंजण, योगेश तायडे यांनी सुनीलआण्णांचे स्वागत केले.

झेंडेमळा येथे राष्ट्रीय कबड्डीपंच वसंत झेंडे तसेच कैलास झेंडे, प्रदीप झेंडे, प्रवीण झेंडे, चेतन झेंडे, पंकज झेंडे, विशाल झेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते.

काळोखे मळा येथे नंदकुमार काळोखे, महेंद्र काळोखे, तानाजी काळोखे, विक्रम काळोखे, विवेक काळोखे, अमोल काळोखे, धनंजय काळोखे, मुरली काळोखे, केतन काळोखे, अश्विनी काळोखे, रत्नमाला काळोखे, निर्मला काळोखे आदींनी शेळके यांचे स्वागत केले.

भेटी लागे जीवा…

सुनील आण्णा शेळके यांची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की लहान मुलांनाही त्यांना भेटल्याशिवाय शाळेत जावे वाटत नाही. आज चिंचोली येथे सुनील शेळके यांचा प्रचार दौरा आसताना समर्थ जाधव नावाचा शाळेत जाणार मुलगा अण्णांना भेटता नाही येणार म्हणून रडत होता त्यांच्या शाळेची बस लवकर आल्याने त्याला सुनील अण्णा यांना भेटायला जमणार नाही म्हणून त्याला असू आवरले नाही आणि तो तसाच इच्छा नसतानाही रडत रडत शाळेत गेला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top