Wednesday, 05 Aug, 12.08 am MPC News

होम पेज
Pune: ऑनलाईन शिक्षणाविषयी रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे शुक्रवारी पालकांसाठी वेबिनार

एमपीसी न्यूज - ऑनलाईन शिक्षणाविषयी जागरुकता, आव्हाने आणि उपाययोजना' या विषयावर पालकांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. रोटरी डिस्ट्रिक्टची साक्षरता समिती 3131, कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलंड, रोटरी क्लब चिंचवड व रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांच्या संयुक्त विद्यमाने हा वेबिनार आयोजित केला आहे.

पालकांसाठी शुक्रवारी ( 7 ऑगस्ट) संध्याकाळी 5 ते 6.30 या वेळात वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. सदर वेबिनार फेसबुक आणि युट्युबवर लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रत्यक्ष सुरू होणे शक्य नाही त्यामुळे, सध्या ऑनलाईन शिक्षणाला पर्याय उरलेला नाही. शासन धोरणा नुसार ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ झालेला आहे. मात्र, बऱ्याच वेळेला पालकांना आपली मुले नक्की ऑनलाईन शिक्षण घेताना काय करत आहे यासंदर्भात संभ्रम पडतो. त्यामुळेच पालकांनाही ऑनलाईन शिक्षणासंदर्भात जागरूक करणे, तसेच या आव्हानांना समर्थपणे पेलण्यासाठी तयार करणे यासाठी हा वेबिनार आयोजित केला आहे.

पूर्व प्रांतपाल रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 रोटेरियन प्रमोद जेजुरीकर आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 प्रांतपाल रोटेरियन रश्मी कुलकर्णी , रोटरी डिस्ट्रिक्ट लिटरसी चेअर रोटेरियन सुबोध मालपाणी आणि डायरेक्टर लिटरसी रोटेरियन दीपा भागवत यांच्या मार्गदर्शनातून या वेबिनारचे आयोजन केले जात आहे.

या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी असून 'ऑनलाइन शिक्षण: आज आणि उद्या' या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.

या वेबिनार मध्ये रोटरी क्लब पुणे प्रिस्टीन अध्यक्ष डॉ. दिनेश नेहेते 'ऑनलाइन शिक्षण: सकारात्मक दृष्टिकोन' या विषयावर तसेच रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखाना नियोजित अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे 'ऑनलाइन शिक्षणाचे तंत्र' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

या वेबिनारला आज पर्यंत जगभरातल्या 15 देशातून, भारतातल्या 16 राज्यातून व महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातून अनेक पालक व शिक्षकांनी नोंदणी केली आहे. वेबिनार च्या समन्वयक रोटेरियन डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले, रोटेरियन चारू श्रोत्री, रोटेरियन अविनाश कोळी, रोटेरियन डॉ. पुष्पा घळसासी, रोटेरियन सुनिता शिरगुप्पी, रोटेरियन संजीवनी मालवणकर आणि रोटेरियन डॉ. तनुजा मराठे यांनी या वेबिनारमध्ये उपस्थित राहण्यासाठी पालक आणि शिक्षकांना आमंत्रित केले आहे.

वेबिनारमध्ये सामील होण्यासाठी गुगल फॉर्म भरावा लागणार आहे किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होता येईल.

वेबिनार नोंदणीसाठी खालील लिंक वापरता येईल:

https://rebrand.ly/online_edu_webinar_registration

टेलिग्राम ग्रुप नोंदणीसाठी:

https://t.me/joinchat/RyKoOhmtE_t4HDKysq3r-A

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top