Friday, 03 Jul, 2.31 pm MPC News

अन्य बातम्या
Pune: 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ'च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजयसिंह डुबल

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांची 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ' या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा आणि राष्ट्रीय सचिव व्ही.के.बंसल यांनी डुबल यांना नियुक्तीचे पत्र दिले.

'सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विजयसिंह डुबल हे व्यापारी उद्योजक आणि उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विजयसिंह डुबल हे सोलापूर जिल्ह्यातील अजनसोंड (पंढरपूर) येथील रहिवासी असून पुण्यामध्ये त्यांचे उद्योगाचे कार्यक्षेत्र आणि मुख्य कार्यालय आहे.

मागील महिन्यात बाटलीबंद पाणी निर्मिती, मिनरल वॉटर निर्मिती उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची असोसिएशन सदस्यांबरोबर झूम मीटिंग करून वीज दर, कर्जासंबंधीच्या अडचणी सोडविल्या होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top