Sunday, 22 Sep, 8.52 am MPC News

टॉप न्यूज
Pune : पुण्यात सोमवारी भाजप फोडणार प्रचाराचा नारळ

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा निवडणुकीचा पुण्यातील प्रचाराचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा केंद्र येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजता करण्यात येणार आहे. भाजपच्या 'विजय संकल्प मेळावा'त लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्या मेळाव्यात नड्डा मार्गदर्शन करणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पा. नड्डा यांचे सोमवारी (दि.23) सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर पुणे दौऱ्यासाठी आगमन होणार आहे. शहर भाजपच्या वतीने विमानतळावर स्वागत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सरचिटणीस व्ही सतीशजी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विमानतळावरून नड्डा दुपारी साडेबारा वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर हॉटेल रामी ग्रँड येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत राखीव वेळ आहे. जैन धर्मगुरू शिवमुनी यांची वर्धमान पूरम, गंगाधाम रस्ता येथे दुपारी चार वाजता भेट घेणार आहेत.

राष्ट्रीय एकता अभियानाअंतर्गत सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल शेरटॉन अँड, राजा बहादूर मिलशेजारी येथे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी नड्डा संवाद साधणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top