Sunday, 12 Jul, 9.28 pm MPC News

होम पेज
Pune : उद्यापासून कडक लॉकडाऊन; खरेदीसाठी पुणेकरांची तोबा गर्दी

एमपीसी न्यूज - सोमवारी मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊन होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आज महिनाभराचा किराणा, भाजीपाला, फळे, पेट्रोल भरण्यासाठी पुणेकरांनी तोबा गर्दी केली होती. मार्केटयार्ड, मंडईत भाजीपाला खरेदीसाठी जत्रेचे स्वरूप आले होते. पुणे शहरातील मध्यवर्ती भागासाह उपनगरांतही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरूच ठेवली होती. यादरम्यान फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

मार्केटयार्डमध्ये भाज्यांचा तुटवडा जाणवला. 30 ते 40 टाक्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी साधारण 100 शेतमालाची आवक झाली. सध्या आषाढ महिना सुरू झाल्याने मासळी, मटण, चिकन, अंड्यांना मागणी असते. पण, यावेळी पालेभाज्यांना मोठी मागणी असल्याचे चित्र दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू होत असलेल्या लॉकडाऊनमुळे सफरचंद, डाळिंब, मोसंबी, पपई, लिंबु, संत्रा या फळांची जास्त प्रमाणात खरेदी झाली. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची घोषणा काय खरेदी करायचे असेल तर करून घ्या, असे पुणेकरांना आवाहन केले होते. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पुणेकरांनी आता घरात बसण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top