Sunday, 06 Oct, 8.04 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Sangvi: आचारसंहितेतही अनधिकृत बांधकामांवर कारवाई; सांगवीतील बांधकामावार हातोडा

एमपीसी न्यूज - आचारसंहितेतही पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरु आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने जुनी सांगवीतील चालू असलेले अनधिकृत भुईसापट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे अश्वासन सत्ताधा-यांनी दिले. मात्र, शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित झाले नाहीत. महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे.

'ग' व 'ह' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 32 जुनी सांगवी येथे अनधिकृत बांधकाम चालू होते. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेल्या आरसीसी व वीट बांधकामवर कारवाई केली. यामध्ये अंदाजे 192 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम भुईसपाट करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) करण्यात आली.

कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन ब्रेकर, ट्रकच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top