Saturday, 11 Jul, 4.21 pm MPC News

होम पेज
Talegaon : आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 'हचिंग्स'चे शंभर नंबरी यश

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील इंग्रजी माध्यमाच्या हचिंग्स स्कुल शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही या शाळेने शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली. ईश्वरी चौधरी, अथर्व गुरव, अखिलेश चेट्टी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

आयसीएसई बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या 2019- 2020 या वर्षीच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हचिंग्स शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कॉर्नेलियस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या शाळेतील ईश्वरी चौधरी हिने 97% गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. अथर्व गुरव याने 95 % गुण मिळवून द्वितीय, तर अखिलेश चेट्टी याने 94% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेतील व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कॉर्नेलियस यांचे, र्व शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top