Saturday, 25 Sep, 12.28 pm MPC News

अन्य बातम्या
Talegaon Dabhade News : चौराई डोंगरावरील अनधिकृत बांधकाम भुईसपाट; वन विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - सोमाटणे येथील चौराई डोंगरावर अतिक्रमण करून बांधलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. ही कारवाई तळेगाव वन विभागाच्या पथकाने केली. फ्रेंड्स ऑफ नेचरने हे अनधिकृत बांधकाम काढण्याची तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमाटणे येथील चौराई डोंगरावर अतिक्रमण करून बांधलेले अनाधिकृत बांधकाम तळेगाव वन विभागाच्या पथकाने कारवाई करून भुईसपाट केले. हि कारवाई अतिशय गोपनीय पध्दतीने भल्या पहाटे करण्यात आली.

तळेगाव पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या चौराई देवी डोंगरावर वनक्षेत्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम काढून टाकावे अशी तक्रार फेण्ड्स ऑफ नेचर असोसिएशनने केली होती. त्यानुसार या कारवाईत वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, सुशील मंतावार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, फेण्ड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन,नीरज शहा, किरण मोकाशी व कार्यकर्ते तसेच पोलीस, वनपाल, वनरक्षक कर्मचारी सहभागी होते.

या ठिकाणी केलेल्या कारवाईत होत असलेल्या प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या, कु-हाडी, करवती आदि साहित्य वन विभागाने जप्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top