Thursday, 05 Sep, 9.47 am MPC News

तळेगाव
Talegaon Dabhade : संस्कारक्षम आणि मूल्यात्मक शिक्षणाची गरज -विनोद शिरसाठ

एमपीसी न्यूज - शिक्षणाच्या संदर्भात गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. यापुढे गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव ही आपल्या देशाची सर्वात महत्वाची समस्या आहे, असे प्रतिपादन 'साधना' साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'शिक्षक कृतज्ञता समारंभा'चे प्रमुख पाहुणे म्हणून शिरसाठ उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे शिरसाठ म्हणाले, 'आपल्याकडे आंतरविद्याशाखीय शिक्षणाची खरी गरज आहे. आपल्या विषयाची मुळे ही इतर विद्याशाखेत गुंतलेली असतात, हे आपल्या लक्षात येत नाही. आज अनेक विषयांचा आंतरिक संबंध तपासणे गरजेचे असल्याचे नमूद केले.'

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मावळभूषण कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, कार्यवाह रामदास काकडे,खजिनदार चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य जी. एस.शिंदे, प्रा. ए. आर. जाधव, शैलेशभाई शहा, महाविद्यालय व विकास समिती सदस्य निरूपा कानिटकर, वसंतराव भेगडे, संजय वाडेकर, यतीन शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांनी केले. यावेळी संस्थेच्या कार्याची ओळख करून देत शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाहुण्यांची ओळख डॉक्टर संदीप कांबळे यांनी करून दिली. संस्थचे अध्यक्ष मावळभूषण कृष्णराव भेगडे यांनी शिक्षक दिनासंबंधी आपली कृतज्ञता व्यक्त करून आपण नोकर आणि आम्ही मालक नसून आपण सर्वजण एका कुटुंबातील सदस्य असल्याचे उदगार काढून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या विविध शाखेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्राचे वितरण करण्यात आले.

पुरस्कारार्थीमध्ये: लता मोहिते, राजेश शेटे, नाटक आनंदा, ढोरे नामदेव, सुबोध गरुड, ज्ञानेश्वर शेलार, प्रा.नेहा जगताप, प्रा. वर्षा ढोबळे, प्रा. गीता घंटी, प्रा. प्रीती मनोहरन, प्रा. अश्विन देशमुख, प्रा. सावळेराम गावडे, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा. गाडेकर, प्रा. एम. एन. कडू, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा.विद्या भेगडे, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य जी. एस. शिंदे यांचा समावेश आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या 'प्रिय दिगेश' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. प्रीती मनोहर, प्रा. राजेंद्र आठवले, प्राचार्य बी. बी. जैन यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली.

संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ' वाचन हा आपल्या विकासाचा पाया आहे, तो अधिक विकसित करण्याची आज गरज आहे. वाचनाने माणसाच्या बुध्दीचा विकास होतो, म्हणून रोज काहीतरी वाचत रहा' असे नमूद केले.

यावेळी संस्थेच्या कानिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. एस. पी. भोसले व प्रा. डी. एम. कण्हेरीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य ए. आर. जाधव यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top