Sunday, 22 Sep, 8.50 pm MPC News

तळेगाव
Talegaon Dabhade : स्वावलंबन फाउंडेशचा स्त्री विश्व कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज - स्वावलंबन फाउंडेशनच्या पुणे शाखेचा स्त्री विश्व हा कार्यक्रम शनिवारी (दि.21) रोजी श्रेयस नर्सरी शाळा तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. याच बरोबर पुणे शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

भारत मातेच्या फोटो समोर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वावलंबनच्या पुणे प्रमुख अपर्णा खोत यांनी स्वावलंबन फाउंडेशनची माहिती दिली.

स्त्री विश्व या संकल्पनेत यशस्वी उद्योजिका अपर्णा खोत यांनी उपस्थितांना यशस्वी होण्यासाठी DMIT चा कसा 100% उपयोग होऊ शकतो. हे समजाऊन सांगितले. मानवी मेंदू हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि त्याला समजून घेतले. तर यशाचे शिखर सर करणे सोपे आहे. असा त्याचा आशय होता.

एक तासाच्या या कार्यक्रमानंतर उपस्थित उद्योजिकांनी आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. प्रत्येकाचे प्राॅडक्ट्स दाखवण्यासाठी टेबल्स ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद होता. उद्योजिकांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. खूप छान आणि कलात्मक वस्तू होत्या. हा संपूर्ण कार्यक्रम मोफत होता आणि यात उद्योजिकांबरोबरच अशाही महिला उपस्थित होत्या. ज्यांना काही तरी करायचंय, महिला सक्षमीकरणाची तळमळ असणाऱ्या याज्ञसेनी राजे दाभाडे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. अपर्णा खोत यांनी प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. 70 च्या जवळपास उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top