Sunday, 22 Sep, 7.09 am MPC News

होम पेज
Vadgaon Maval : एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत मदत करणा-यांचा गुणगौरव

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चा मावळ तालुका आयोजित एक हात मदतीचा सामाजिक जाणिवेचा या मदतीच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत मदत करणा-या सर्वांचे आभार प्रदर्शन व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन वडगाव येथील शितल हाॅटेलमध्ये करण्यात आले होते.

दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मावळ तालुक्यातील उद्योग व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा उद्योजकांचा सकल मराठा समाज मावळच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी उद्योजक पुरस्कार रामदास (आप्पा) काकडे मराठा क्रांती मोर्चा उत्कृष्ट कायदेतज्ज्ञ पुरस्कार अॅड तुकाराम काटे, मराठा क्रांती मोर्चा कृषी भूषण पुरस्कार मारुती दळवी (ललित नर्सरी) मराठा क्रांती मोर्चा यशस्वी हाॅटेल व्यावसायिक पुरस्कार अतुल वायकर (हाॅटेल शिवराज) मराठा क्रांती मोर्चा उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार सावरी सत्यवान सातकर मराठा क्रांती मोर्चा यशस्वी बांधकाम व्यावसायिक पुरस्कार स्वरूप कन्स्ट्रक्शन तळेगाव दाभाडे विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

रामदास आप्पा काकडे यांनी आपला जीवनप्रवास व आर्थिक विकास बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांच्याच विचारावर आपण ही प्रगती करु शकलो असे सांगितले. तसेच वडगाव पोलीस स्टेशनचे निबांळकर, गणेशजी तावरे, सोनवणे, आंबेकर, तळेगाव पोलीस स्टेशनचे भोसले, यांचाही सत्कार करण्यात आला.

उपस्थितांमध्ये तालुका समन्वयक-तळेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, किरणजी गायकवाड, गणेश भेगडे, अशोक म्हाळस्कर, विजय तिकोणे, दिनेश ठोंबरे, अर्जुन आप्पा ढोरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. महिला समन्वयकामध्ये, सुजाता भेगडे, हेमांगी ढोरे, सुनिता तुमकर, संध्या शेळके आदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संयोजन - मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश भेगडे, भाऊसाहेब ढोरे, तुषार वहिले, लक्ष्मण घोजगे, अमोल ढोरे, गोट्या सुतार, दिनेश ठोंबरे, आदिंनी केले. स्वागत- भाऊसाहेब ढोरे, सूत्रसंचालन - गणेश भेगडे, आभार - विजय तिकोणे, तुषार वहिले यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top