Wednesday, 05 Aug, 7.46 am MPC News

तळेगाव
Vadgaon Maval: मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक कर माफ करावा- राजेश खांडभोर

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक करदात्यांचा कर माफ करावा, अशी मागणी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

कोरोनामुळे जनतेला मोठ्या आर्थिक संकटास सामोरे जावे लागले आहे. उद्योगधंदे, शेती आदी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्याने अनेक जणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे.

काही परिवारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांना आपण राहतो त्या ग्रामपंचायत हद्दीतील कर भरणे मुश्किल झाले आहे. त्याच महसुलाच्या जोरावर विविध विकास कामे ग्रामपंचायत कर्मचारी वेतन करणे, पाणी योजना चालविणे आदी या करातून ग्रामपंचायत काम करत असते.

पंचायत समितीने सर्व ग्रामपंचायतींना आपल्या फंडातून देऊन कर द्यावा आणि ग्रामपंचायीच्या हद्दीतील स्थानिकांचा कर माफ करावा अशी, मागणी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top