Monday, 23 Nov, 10.30 am MPC News

अन्य बातम्या
Vadgaon Maval : वारंगवाडी मावळ येथील आरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : वारंगवाडी मावळ येथे उद्योजक किशोर आवारे यांच्या जन्मदिना निमित्त सुदर्शन तरूण मंडळ व कै बबनराव कलावडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार (दि19) रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन क रण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य तपासणी, रक्तदान, नेत्रतपासणी करण्यात आली. शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

आरोग्य शिबीराचे उदघाटन इंद्रायणी उद्योग समुहाचे संचालक संतोष शेळके व तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष शिंदे, सुनिल पवार, तुकाराम वारींगे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतिश कलावडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष महेंद्र वारींगे, युवा उद्योजक प्रफुल्ल शिंदे, सोमनाथ पवार, चेअरमन रामनाथ कलावडे, संजय वारींगे, आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम कलावडे, कामगार नेते नितीन नखाते, माजी उपसरपंच जितेंद्र घोजगे, दत्तात्रय वारींगे, आत्माराम शिंदे, चंद्रकांत शिंदे, पंडित दाभाडे, संजय दाभाडे, अंगद वारींगे, दत्तात्रय कलावडे, सामाजिक कार्यकर्ते राहूल पारगे, डाॅक्टर्स व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आरोग्य शिबिरामध्ये 110 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 45 युवकांनी रक्तदान केले. या वर्षी झालेल्या चक्री वादळामुळे गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेडच्या झालेल्या नुकसानीचे काम किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराच्या वतीने करून देण्यात आले. यावेळी उद्योजक संतोष शेळके व नगरसेवक संतोष शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय वारींगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top