Monday, 13 Jul, 9.59 am MPC News

महाराष्ट्र
Weather Update: पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातही मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज- मुंबई शहरासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा येथेही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मागील 24 तासांत मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडला आहे. दक्षिण कोकणमध्ये ढग जमा झाले आहेत. कोकण आणि मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनच्या पहिल्या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाला होता. यामध्ये कुर्ला, घाटकोपर, सांताक्रूझ, मालाड, अंधेरी आणि मुलुंड सारख्या भागांचा समावेश होता. मुंबईतील रस्त्यांचे रुपांतर नाल्यात झाले होते. रस्त्यांवर गुडघ्यांपर्यंत पाणी साचले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top