Tuesday, 22 Sep, 11.33 am मुलुख मैदान

होम
ही साऊथची क्वीन बुमराहसाठी वेडी झालीय, म्हणते लग्नासाठी बुमराचा हवा; पण बुमरा म्हणतोय..

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नंतर आत्ता परत एकदा क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्रीचा संगम होऊ शकतो. तसे पण बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे नाते खुप जुने आहे. अनेक अभिनेत्री अनेक क्रिकेटरच्या प्रेमात पडल्या आहेत. तर अनेक क्रिकेटपटूने अभिनेत्रींशी लग्न केले आहे.

आजपर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्री क्रिकेटपटूच्या प्रेमात पडल्या आहेत. पण आत्ता या यादीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीचासुध्दा समावेश झाला आहे. साऊथ चित्रपटांतील अभिनेत्री एका क्रिकेटपटूच्या प्रेमात पडली आहे.

ही अभिनेत्री आहे साऊथची ब्युटी राशी खन्ना. राशी खन्ना जसप्रीत बुमराहच्या प्रेमात पडली आहे. तिने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. राशी खन्ना जसप्रीत बुमराहाला खुप पसंत करते.

राशीने सांगितले की, तिला जसप्रीत बुमराह खुप जास्त आवडतो. ती त्याच्यासाठी सर्व मॅच बघते. एवढेच नाही तर राशी खन्ना जसप्रीतसाठी क्रिकेट खेळायला देखील शिकत आहे.

राशीचे म्हणणे आहे की, सध्याच्या घडीला टिम इंडियामध्ये जसप्रीत बुमराह सर्वात हँडसम क्रिकेटर आहे. त्याच्या सारखे लुक्स दुसऱ्या कोणालाही नाहीत. त्यामूळे ती जसप्रीतच्या प्रेमात पडली आणि तिला संधी मिळाली तर ती, त्याच्याशी लग्न करायला देखील तयार आहे.

अनेक वेळा राशी खन्नाने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. त्यासोबतच ती तिच्या अनेक मुलाखतींमध्ये देखील जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना दिसते.

राशी खन्नाला अनेक वेळा तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात येते. त्यावेळी ती उत्तर देते की, जसप्रीत बुमराह सारखा नवरा हवा आहे. पण जसप्रीत बुमराह मात्र राशीला चांगली मैत्रीण मानतो. जसप्रीत बुमराहला राशी खन्नाचा अभिनय आवडतो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top