Sunday, 09 Aug, 11.04 pm मुलुख मैदान

होम
केंद्राने दिले भाजीविक्रेते, दुकानदारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश; जाणून घ्या यामागचे कारण..

नवी दिल्ली | कोरोना रुग्णांचा मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किराणा मालाच्या दुकानातील कर्मचारी, भाजी, फळविक्रेते यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

या लोकांपैकी जे कोरोनाग्रस्त असतील त्यांच्यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची चाचणी प्रधान्याने करण्यात यावी, असे सरकारने सांगितले आहे.

कोरोना रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सुविधा असायलाच हवी. एखाद्या रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी संपर्क साधल्यानंतर किती वेळात त्यांच्याकडे रुग्णवाहिका पोहोचते किंवा रुग्णवाहिका येण्यास नकार मिळतो यावर राज्यांनी दररोज बारीक लक्ष ठेवले पाहिजे.

नकाराचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. वयोवृद्धांची काळजी घ्या. घरोघरी जाऊन चाचणी करण्याचेही अनेक फायदे आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन टेस्ट करा.

घरातील वयोवृद्ध, गरोदर महिला यांच्या प्रकृतीला कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना जपणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे पत्र केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना लिहिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top