Tuesday, 22 Sep, 8.49 am मुलुख मैदान

होम
लोकांकडे पैसे नाहीत म्हणून जीव जातायेत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माजीप्रमुखांना अश्रू अनावर

मुंबई | दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील विक्रमी वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच रुग्णांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढताना पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यात लोकांकडे पैसे नसल्याने उपचाराअभावी त्यांचे जीव जात आहेत असा आरोप मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी केला आहे. 'लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत, त्यांचे जीव जात आहेत, त्यांना वाचवा' असे त्यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले.

याबाबत ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी सुरु करण्यासाठी न्यायालयात देखील धाव घेतली आहे. त्यांनी न्यायालयाकडे याबाबतच्या तांत्रिक त्रुटी दूर करुन गरीबांना मदतीचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, 'आम्ही १७ लाख लोकांना मदत केली होती. आजही मदतीसाठी मला रोज सहाशेहून अधिक मेसेज येतात. त्यांना उत्तर देता देता मी थकलोय, अशा शब्दांत ओमप्रकाश शेटे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या आधीच्या युती सरकारच्या काळात गोर-गरीब रुग्णांना त्यांच्या आजारावरील खर्चिक उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंत्रालयात स्थापन करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देत निधी उपलब्ध करून दिला.

तसेच या सहायता निधाच्या माध्यमातून गोर-गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देखील झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. परंतु मुख्यमंत्री सहायता निधीचे काम आणि त्यातून होणारी मदत अजूनही पुर्णपणे ठप्प आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करताच कंगना कडाडली; म्हणाली.
अनुरागला पाठिंबा देण्यासाठी त्याची दुसरी बायको कल्की कोचलीन उतरली मैदानात.
.तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंना सहा महीने तुरूंगात बसावे लागणार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top