Saturday, 08 Aug, 7.32 pm मुलुख मैदान

होम
महाराजांचा पुतळा बसवायला खळखळ करणाऱ्या एमआयटीची राममंदीराला मात्र २१ कोटींची देणगी

मुंबई | अयोध्येमध्ये बुधवारी राम मंदिराच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला आहे.

राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून कोट्यवधी रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. आता अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एमआयटी शिक्षण संस्थेकडून २१ कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र एकेकाळी याच एमआयटी शिक्षण संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास चालढकल केली जात होती. त्यामुळे राम मंदिरासाठी दिलेल्या २१ कोटींच्या देणगीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२०१९ मध्ये जानेवारी महिन्यात लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या, जगविख्यात घुमटामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यासाठी चालढकल करत असल्याचे दिसून आले होते. यामुळे 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या वतीने उपोषणही पुकारण्यात आले होते.

त्यामुळे एकवेळ महाराजांचा पुतळा बसवायला खळखळ करणाऱ्या एमआयटीची, राममंदीराला मात्र २१ कोटींची देणगी दिल्याने सगळीकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, एमआयटी एटीडी विद्यापीठ, अवंतिका विद्यापीठ, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह येथील सुमारे ७५ हजार विद्यार्थी, ५ हजार शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही २१ कोटींची देणगी देण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top