Tuesday, 22 Sep, 11.41 am मुलुख मैदान

ताज्या बातम्या
मालिकेत साधी भोळी दिसणारी माधवी भाभी खऱ्या आयुष्यात आहे खुपच मॉडर्न

गेल्या बारा वर्षांपासून इंडियन टेलिव्हिजनवर एक मालिका राज्य करत आहे. या मालिकेचे नाव आहे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. गेली बारा वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एवढी वर्ष झाली पण अजूनही ही मालिका नव्यासारखी वाटते.

२८ जुलै २००८ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि आता या मालिकेला तब्बल बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेने आता तेराव्या वर्षात पदार्पण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्र खुप हिट झाली आहेत.

जेठालाल, तारक मेहता, आत्माराम भिडे,अय्यर, बबीता, माधवी, अंजली कोमल, डॉ हाथी आणि संपूर्ण टपूसेना भारतामध्ये प्रसिद्ध आहे. या मालिकेतील बहुतेक व्यक्तिरेखांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.

आज आपण या मालिकेतील माधवी भाभी म्हणजे सोनालीका जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. या मालिकेत सोनालीकाने एका साध्या स्त्रीची भुमिका निभावली आहे. त्यासोबतच ती या मालिकेत लोणचं आणि पापडाचा व्यवसाय करताना दिसते.

मालिकेत साधी भोळी दिसणारी सोनालीका खऱ्या आयुष्यात मात्र खुप मॉडर्न आहे. तिला फिरायला जायला खुप आवडते. यासोबतच सोनालीकाला गाड्यांची देखील खुप जास्त आवड आहे.

सोनालीकाचा जन्म मुंबईत झाला. त्यानंतर तिचे सगळे शिक्षण देखील मुंबईतंच झाले. कॉलेजमध्ये असताना सोनालीकाला नाटकांची आवड निर्माण झाली. त्यामूळे तिने नाटकांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनच तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली.

अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर सोनालीकाने टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करण्यापूर्वी सोनालीकाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. पण या मालिकेने तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

सोनालीका खऱ्या आयुष्यात खुप मॉडर्न राहते. तिला वेगवेगळे फोटोशूट करायला आवडतात. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या फॅन्ससाठी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.

मालिकेत साधी भोळी दिसणारी सोनालीका खऱ्या आयुष्यात मात्र खुप मॉडर्न आहे. ती सिगरेट देखील ओढते. सोनालीका तिच्या मालिकेच्या एका दिवसाच्या शुटसाठी २५,००० रुपये घेते. या मालिकेने सोनालीकाचे पुर्ण आयुष्य बदलून टाकले.

सध्याची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिले जाते. या मालिकेची निर्मिती नीला टेलिफिल्मसने केली आहे. असित कुमार मोदी निर्माते आहेत. हि मालिका गेल्या बारा वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

भल्या भल्यांची विकेट काढणाऱ्या बुमराहची दांडी उडवलीय 'या' साऊथच्या ब्युटीने

'पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजितदादा पवारांनीच'

टाटा सुमोच्या नावाची गोष्ट तुम्हाला माहीतीय का? वाचा ती मन हेलावून टाकनारी स्टोरी

शाहरुख खानची लाडली सुहाना खानच्या फोटोवरून तुमची नजर हटणार नाही

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top