Sunday, 20 Sep, 12.47 pm मुलुख मैदान

होम
व्हायरल व्हिडीओमुळे समजले सुशांत आणि रिया सोबतच करायचे 'ही' गोष्ट

मुंबई| सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अमली पदार्थांच्या सेवनासाठी एनसीबी अंतर्गत अटक करण्यात आली आहे. नुकताच सुशांत आणि रियाचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये सुशांत आणि रिया सिगारेट रोल ओढताना दिसत आहेत. रिया सुशांतला आय लव्ह यु म्हणते मात्र सुशांत तिला 'होप सो' असे म्हणतो. या व्हिडीओमध्ये सुशांत एक भक्तीगीत देखील म्हणताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सुशांत आणि रिया सोबत सँम्युअल मिरांडा आणि सिद्धार्थ पिठानी हे दोघे देखील आहेत.या व्हिडीओमध्ये सुशांत पूर्णपणे नशेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सुशांतला हे काय आहे विचारत असते तेव्हा सुशांत त्याला गमतीदार उत्तर देत म्हणतो हे व्हीएफएक्स आहे. त्यावरती रिया त्या व्यक्तीला सांगते हे सिगारेट रोल आहे.

दरम्यान, रियाने दिलेल्या माहितीनुसार सुशांतला एका फिल्ममेकरने अमली पदार्थांच्या सेवनाची सवय लावली होती. तोच सुशांतला मोठ्या पार्टीमध्ये घेऊन जात होता. तिथे मोठ्या प्रमाणावरती कोकेन, गांजा, एलएसडीचे सेवन होत होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top