Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अल्पवयीनांची वयोमर्यादा 18 ऐवजी 16 वर्षांची करण्याचा प्रस्ताव

अल्पवयीनांची वयोमर्यादा 18 ऐवजी 16 वर्षांची करण्याचा प्रस्ताव

Mumbai Live 9 hrs ago

राज्यात अल्पवयीनांकडून वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अल्पवयीनांची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षांवर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी गैरवापर होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अल्पवयीनांची कायदेशीर वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 वर्षांवरील अल्पवयीनांवर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रौढांप्रमाणे खटला चालवता येतो.

मात्र, अल्पवयीनांची वयोमर्यादा बदलण्याचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारकडे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच केंद्राकडे अधिकृत प्रस्ताव पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi