Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BEST डेपोच्या पुनर्विकासावरून BMC बैठकीत खडाजंगी

BEST डेपोच्या पुनर्विकासावरून BMC बैठकीत खडाजंगी

Mumbai Live 4 days ago

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत BEST डेपोच्या पुनर्विकासाचा मुद्दा कशा पद्धतीने हाताळला जात आहे , यावर नाराजी व्यक्त केली.

यावेळी आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावरही थेट निशाणा साधला.

बैठकीचं कामकाज व्यवस्थित हाताळता येत नसेल, तर महापौरांनी पदावरून पायउतार व्हावं, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

BESTच्या डेपोच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या मुंबईच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. BESTच्या मालमत्तांचा पुनर्विकास नेमका कसा होणार, त्यातून मुंबईकरांना काय मिळणार आणि या प्रक्रियेत पारदर्शकता किती आहे, यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं जात आहे.

नव्याने स्थापन झालेल्या मुंबई महापालिकेतही सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

BESTच्या डेपोच्या पुनर्विकासावरून सुरू झालेला वाद आता थेट महापौरांच्या कामकाजापर्यंत पोहोचला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi