Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डहाणू ते चर्चगेट लोकल पहाटेच्या वेळेसही धावणार

डहाणू ते चर्चगेट लोकल पहाटेच्या वेळेसही धावणार

Mumbai Live 3 weeks ago

पालघर (palghar) लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा (hemant savra) यांनी पश्चिम रेल्वेचे (western railway) महाव्यवस्थापक रामाश्रय पांडेय यांची भेट घेतली.

या बैठकीत पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी पहाटे 4 वाजल्यापासून डहाणूहून चर्चगेटकडे (churchgate) नवीन लोकल (mumbai local) सेवा सुरू करण्याबाबत पश्चिम रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली.

यामध्ये हिसार-खडकी (22979/22980), तिरुचिरापल्ली-अहमदाबाद, वांद्रे-अजमेर (19625/19626), अहमदाबाद-मंगळूर, मुंबई-काठगोदाम (21907/21908) आणि वांद्रे-जबलपूर (20163/20164) या गाड्यांचा समावेश आहे.

तसेच, वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस (12935/12936) आणि वांद्रे-गाझीपूर एक्स्प्रेस (20941/20942) या गाड्यांना थांबा देण्याची व्यवहार्यता रेल्वेकडून यापूर्वी तपासण्यात आली.

याशिवाय वांद्रे-भावनगर (12971/12972), दौंड-इंदूर (22943/22944), दादर-अजमेर (12989/12990) आणि सूर्यनगरी एक्स्प्रेस (12479/12480) यांनाही पालघर स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली.

डहाणू रोड (dahanu road) स्थानकावरील फलाट क्रमांक 4 आणि 5 यांची लांबी वाढवून ती 15 डब्यांच्या गाड्यांसाठी योग्य करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

नोकरदार वर्गासाठी पहाटे 4 वाजता डहाणूहून चर्चगेटकडे आणि दुपारी 2 वाजता चर्चगेटहून डहाणू रोडकडे नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.

औद्योगिक वाढ लक्षात घेता डहाणू रोड आणि बोईसर स्थानकांवर अतिरिक्त थांब्यांची आवश्यकता असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

डहाणू रोड स्थानकावर पुणे-भुज एक्स्प्रेस (11901/11902) आणि खान्देश एक्स्प्रेस (19003/19004) यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच बोईसर स्थानकावर कोईम्बतूर-राजकोट एक्स्प्रेस (16613/16614) आणि वांद्रे-रामनगर एक्स्प्रेस (22975/22976) यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली.

विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे खासदार सवरा यांनी निदर्शनास आणून देत हे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी केली.

विरार-डहाणू मेमू (69173/69174) सेवेचा विस्तार उमरगाव रोडपर्यंत करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन 93002, 93004 आणि 93033 या उपनगरीय गाड्यांचे 15 डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली.

कोलगाव (पालघर) येथील जेनेसिस इंडस्ट्रियल टाऊनशिपजवळील रेल्वे गेट क्रमांक 48 कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने दररोज सुमारे 3 ते 4 हजार कामगार आणि स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्याची बाब खासदार सवरा यांनी निदर्शनास आणून दिली.

सध्याचा उड्डाणपूल सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असल्याने त्याचा कामगारांना विशेष उपयोग होत नसल्याचे सांगत, बंद करण्यात आलेल्या रेल्वे गेट क्रमांक 48 जवळ तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi