Sunday, 26 Jan, 8.30 am Mumbai Live

व्यवसाय
'ह्या' ४ विमा पॉलिसी प्रत्येकाने घ्यायलाच हव्यातHome Insurance घेणं का आवश्यक? 'हे' आहे कारण

विमा ( insurance) म्हटलं की सर्वांनाच जीवन विमा (life insurance) , आरोग्य विमा (health insurance) किंवा वाहन विमा (auto insurance) असं प्रचलित विमा आठवतात. मात्र, असे बरेच विमा आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. बरेच लोक कर कमी करण्यासाठी विमा खरेदी करतात . पण विमा केवळ कर बचतीसाठी नाही हे लक्षात घ्यायला हवं . विम्याची आयुष्यात खूप महत्वाची भूमिका असते. आम्ही अशाच काही विमा पॉलिसीबद्दल सांगत आहोत, ज्याची बहुतेक लोकांना माहिती नाही.

ट्रॅव्हल इन्शुरन्स - प्रवास विमा ( Travel Insurance)

सर्वसामान्यांना परदेशात जाणे इतके सोपे नाही . जर एखादा सामान्य नागरिक परदेश दौ ऱ्यावर गेला आणि दुर्दैवाने आपली कागदपत्रे किंवा वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास किंवा जर अचानक त्याला एखाद्या आजाराने ग्रासले असेल तर त्याचा खर्च आणखी वाढेल . अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्सचा उपयोग होतो . काही देशांमध्ये प्रवास करताना प्रवास विमा घेणे अनिवार्य आहे .

लग्नाचा विमा ( marriage insurance)

लग्नाचा देखील विमा काढला जातो . बऱ्याचदा असं दिसून आलं आहे की , लग्नात चोरी , आग , अपघात , मृत्यू आदी कारणांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली जाते . त्यानंतर आगाऊ बुकिंग रद्द केल्याने मोठे नुकसान होते . अ शी आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी लग्नाचा विमा उपयुक्त ठरतो . त्यामुळे होणारे नुकसान वाचले जाते .

गृह विमा (home insurance)

Credit Card security insurance प ्रत्येकासाठी घर अशी एक मालमत्ता आहे ज्यामध्ये पुन्हा पुन्हा गुंतवणूक केली जात नाही . घर पुन्हा पुन्हा बांधले जात नाही . आ पण घर बांधल्यानंतर किंवा घर घेतल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेबद्दल जास्त विचार करत नाही . पूर , वादळ , भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तींमध्ये घराचे नुकसान होते . जर तुमच्याकडे गृह विमा असेल तर अशा नुकसानीपासून वाचण्यास मोठी मदत मिळते . नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी गृह विमा घेणं अत्यंत आवश्यक आहे . कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत वास्तविक नुकसान किती झाले हे सांगणे कठीण आहे . परंतु ज्यांना त्यांच्या आर्थिक गरजा समजल्या आहेत आणि योग्य विमा निवडला आहे , त्यांच्या नुकसानीची भरपाई मोठ्या प्रमाणात केली जाते . म्हणूनच , गृह विमा घेणं का महत्त्वाचं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे . बहुतेक विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरांचा विमा पॉलिसी देतात .

क्रेडिट कार्ड सुरक्षा विमा ( Credit Card security insurance)

डेबिट कार्ड्स , क्रेडिट कार्ड्स , रिटेल आणि सदस्यता कार्डचे संरक्षण करण्यासाठी या प्रकारच्या विम्याचा वापर केला जातो . ब ऱ्याच क्रेडिट कार्ड कंपन्या चोरी , फसवणूक , कार्ड गमावणे इ . साठी विमा संरक्षण देतात .

Home Insurance घेणं का आवश्यक? 'हे' आहे कारण

करबचतीसाठी पोस्ट आॅफिसच्या 'ह्या' ५ योजना

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi
Top