Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई पोलिसांच्या माऊंटेड युनिटसाठी 1.27 कोटींचा निधी मंजूर

मुंबई पोलिसांच्या माऊंटेड युनिटसाठी 1.27 कोटींचा निधी मंजूर

Mumbai Live 3 days ago

या निधीतून नवीन घोड्यांची खरेदी, घोडेस्वारीसाठी आवश्यक साहित्य, घोड्यांची पशुवैद्यकीय तपासणी आणि उपचार, प्रशिक्षकांचे मानधन तसेच तबेल्याशी संबंधित खर्च भागवला जाणार आहे. हा खर्च 2026-27 या आर्थिक वर्षातील सिटी पोलिस इस्टॅब्लिशमेंटच्या बजेटमधून केला जाणार आहे.

मुंबई पोलिसांसाठी माऊंटेड पोलिस युनिट स्थापन करण्याला फेब्रुवारी 2019 मध्ये तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. या युनिटसाठी 30 घोड्यांचा प्रस्ताव होता. अंधेरीतील मारोल येथे या युनिटसाठी कायमस्वरूपी तबेला उभारण्यात आला आहे.

गर्दीची ठिकाणं, वाहतूक नियंत्रण आणि मुंबईतील चौपाट्यांसारख्या समुद्रकिनारी भागांमध्ये गस्त घालण्यासाठी घोडेस्वार पोलिसांचा उपयोग होऊ शकतो. वाहनांना पोहोचणं कठीण असलेल्या गर्दीच्या ठिकाणी माऊंटेड पोलिस अधिक प्रभावी ठरू शकतात.

मुंबई पोलिसांच्या माऊंटेड युनिटचा इतिहासही जुना आहे. 1930च्या दशकाच्या सुरुवातीला हे युनिट बंद करण्यात आलं होतं आणि तब्बल आठ दशकांनंतर 2011 मध्ये त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं.

अलीकडे युनिटमध्ये 13 नवीन घोड्यांची भर पडली असून, सध्या घोड्यांची संख्या 16 असल्याची माहिती आहे. आता सरकारच्या 1.27 कोटींच्या निधीमुळे नवीन घोडे, प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांपासून चौपाट्यांपर्यंत आता घोडेस्वार पोलिसांची गस्त आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi