Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट'

Mumbai Live 2 weeks ago

मुंबई (mumbai) महानगर क्षेत्रात मान्सूनचा जोर कायम असल्याने, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे (thane), पालघर (palghar) आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' (Orange alert) जारी केला आहे.

पुढील तीन तासांत या जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (mumbai rains) पडत आहे. रात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच सकाळच्या वेळी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, बोरीवली आणि दहिसर यांसारख्या पश्चिम उपनगरांमध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाला, तर दादर, मुलुंड आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) च्या काही भागांतही पाणी साचल्याच्या घटना घडल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 8 ते शुक्रवारी सकाळी 7 या कालावधीत शहरात सरासरी 114 मिमी पावसाची नोंद झाली.

याच कालावधीत पूर्व उपनगरांमध्ये 102 मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये सरासरी 109 मिमी पाऊस पडला.

सर्वाधिक पाऊस मलबार हिल (146 मिमी) येथे झाला. त्यानंतर फोर्ट (139 मिमी), अंधेरी (136 मिमी), वर्सोवा (129 मिमी), पवई (124 मिमी), मानखुर्द (118 मिमी), भांडुप (116 मिमी) आणि मुलुंड (115 मिमी) या भागांचा क्रमांक लागतो.

हवामान विभागाने इशारा दिला आहे की, शनिवार-रविवारीही मुंबई आणि उत्तर कोकण भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि पालघरसाठी 'ऑरेंज अलर्ट' कायम आहे, तर अत्यंत मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शनिवारी ठाणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला जाण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः सखल आणि पूरप्रवण भागातील रहिवाशांना, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi