Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत ऑगस्टमध्ये कमी पावसाची नोंद

मुंबईत ऑगस्टमध्ये कमी पावसाची नोंद

Mumbai Live 3 weeks ago

जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे हवामान ढगाळ आणि दमट राहिलं, मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये 4 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.

मात्र, या काळात मुसळधार किंवा मोठ्या पावसाच्या सरींची शक्यता कमी आहे. मुंबईत अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात.

मान्सून आता हळूहळू अखेरच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याने पावसाची सक्रियता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांना सलग मुसळधार पावसाऐवजी अधूनमधून पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरणाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाच्या वितरणात मोठी असमानता दिसून आली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi