'माथेरान क्वीन' (Matheran queen) म्हणून लोकप्रिय असलेली नेरळ (Neral)-माथेरान मिनी ट्रेन, पावसाळ्यातील हंगामी स्थगितीनंतर 30 ऑक्टोबर 2026 पासून पुन्हा सुरू होणार आहे.
या थेट रेल्वे सेवेच्या पुनरारंभाचा फायदा हिवाळी पर्यटन हंगाम आणि सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात या थंड हवेच्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना होईल.
पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून 15 जून रोजी ही सेवा स्थगित करण्यात आली होती.
सुरुवातीला ही स्थगिती 15 ऑक्टोबरपर्यंत होती, परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव ती 29 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान, माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा सुरूच होती.
थेट मार्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे, नेरळ आणि माथेरान दरम्यान दररोज दोन्ही दिशांना प्रत्येकी दोन फेऱ्या चालवल्या जातील. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणपणे दोन तास 40 मिनिटांचा वेळ लागेल.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे वेळापत्रक
नेरळ ते माथेरान (matheran)
ट्रेन 52103 : नेरळवरून सकाळी 8:50 वाजता सुटेल आणि माथेरानला सकाळी 11:30 वाजता पोहोचेल.
ट्रेन 52105 : नेरळवरून सकाळी 10:25 वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी 1:05 वाजता पोहोचेल.
माथेरान ते नेरळ
ट्रेन 52104: माथेरानवरून दुपारी 2:45 वाजता सुटेल आणि नेरळला संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचेल.
ट्रेन 52106: माथेरानवरून दुपारी 4:00 वाजता सुटेल आणि नेरळला संध्याकाळी 6:40 वाजता पोहोचेल.
या मिनी ट्रेनमध्ये (Toy Train) एकूण सहा डबे असतील, ज्यामध्ये तीन द्वितीय श्रेणीचे (सेकंड क्लास) डबे, एक प्रथम श्रेणीचा (फर्स्ट क्लास) डबा आणि दोन द्वितीय श्रेणीचे सामान वाहून नेणारे डबे (लगेज व्हॅन) यांचा समावेश असेल.
अमन लॉज आणि माथेरान दरम्यानची शटल सेवा दररोज सुरू राहील, ज्यामध्ये दोन्ही दिशांना प्रत्येकी सहा फेऱ्या असतील. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता, शनिवार आणि रविवारी अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवल्या जातील. अमन लॉज ते माथेरान
सकाळी 8:45 - सकाळी 9:03
सकाळी 9:35 - सकाळी 9:53
दुपारी 12:00 - दुपारी 12:18
दुपारी 2:25 - दुपारी 2:43
दुपारी 3:40 - दुपारी 3:58
संध्याकाळी 5:45 - संध्याकाळी 6:03
विकेंडला (शनिवार-रविवार) उपलब्ध अतिरिक्त सेवा:
सकाळी 10:30 - सकाळी 10:48
दुपारी 1:35 - दुपारी 1:53
माथेरान ते अमन लॉज
सकाळी 8:20 - सकाळी 8:38
सकाळी 9:10 - सकाळी 9:28
सकाळी 11:35 - सकाळी 11:53
दुपारी 2:00 - दुपारी 2:18
दुपारी 3:15 - दुपारी 3:33
संध्याकाळी 5:20 - संध्याकाळी 5:38
विकेंडला (शनिवार-रविवार) उपलब्ध अतिरिक्त सेवा:
सकाळी 10:05 - सकाळी 10:23
दुपारी 1:10 - दुपारी 1:28
पर्यटकांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या वेळा तपासून घ्याव्यात.

