Thursday, 08 Apr, 9.01 am Mumbai Live

आरोग्य
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना लसींचा तुटवडा, लसीकरण ठप्प

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर आता राज्यात कोरोना लसीचा तुटवडाही निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्याने पनवेलमध्ये लसीकरण पूर्णतः ठप्प झालं आहे. पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र, लसींचा तुटवडा असल्या कारणाने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहणार आहे, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेकडून देण्यात आली. पनवेल मनपाच्या माध्यमातून सध्या कोव्हँंक्सीन आणि कोव्हीशिल्ड अशा दोन प्रकारच्या लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. त्यात कोव्हीशिल्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण सुविधा बंद करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात २१ लसीकरण केंद्र सुरू आहेत. यात ९ शासकीय व १२ खासगी केंद्रात हे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ६३ हजार ८७९ जणांचं लसीकरण झालं आहे. रोज सरासरी २५०० जणांचं लसीकरण होत आहे. लसींचा साठा उपलब्ध झाला की पुन्हा हे लसीकरण सुरू करण्यात येईल, मात्र तोपर्यत हे लसीकरण बंद राहील, असं पनवेल महापालिकेने म्हटलं आहे.

सद्या राज्यात फक्त १४ लाख लसमात्रा शिल्लक असून, हा साठा केवळ तीन दिवस पुरेल. वेळेत लसीचा पुरवठा झाला नाही तर लसीकरण बंद पडेल. त्यामुळे लशीचा पुरवठा करा, अशी मागणी वारंवार केंद्र सरकारकडे करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

-

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

-

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi
Top