Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रगत तंत्रज्ञानाद्वारे रस्ते दुरुस्ती करण्यावर पालिकेचा भर

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे रस्ते दुरुस्ती करण्यावर पालिकेचा भर

Mumbai Live 3 weeks ago

पालिकेकडून Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ईर्स्टन एक्स्प्रेस हाय वे Eastern Express Highway (EEH) आणि वेर्स्टन एक्स्प्रेस हायवे Western Express Highway (WEH) दुरुस्तीसाठी मोठा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवणे आणि रस्त्यांची स्थिती सुधारण्यावर या योजनेचा मुख्य भर आहे.

या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 164.94 कोटी रुपये आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये 130 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र नव्या प्रस्तावात कामाचा विस्तार आणि खर्च वाढवण्यात आला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

पालिका (BMC) कडून EEH आणि WEH च्या मुख्य रस्त्यांवर मायक्रो-सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे रस्त्यांचे नुकसान कमी होईल आणि वाहनचालकांना अधिक आरामदायी प्रवास करता येईल. EEH साठी 77.14 कोटी रुपयांची तर WEH साठी 87.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

WEH हा रस्ता 3 ऑक्टोबर 2022 रोजी Mumbai Metropolitan Region Development Authority कडून BMC कडे 'जैसे थे' स्थितीत हस्तांतरित करण्यात आला होता. त्यानंतर BMC कडून या रस्त्यांची देखभाल सुरू आहे.

दरवर्षीप्रमाणे विविध भागांमध्ये पॅचवर्कसाठी टेंडर काढले जातात. WEH वरील दत्तपाडा, वाकोला, आरे, नॅशनल पार्क आणि रावळपाडा येथील पुलांवर मॅस्टिक अॅस्फाल्ट वापरून दुरुस्ती सुरू आहे.

तसेच, EEH आणि जोडरस्त्यांवरील काही महत्त्वाच्या ठिकाणीही काम सुरू आहे. यात कुर्ला ब्रिज, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, चेडा नगर, घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, विक्रोळी आणि ऐरोली जंक्शन या भागांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे पावसाळ्यातील खड्ड्यांची समस्या कमी होण्याची आणि मुंबईकरांना अधिक सुरक्षित व सुरळीत प्रवासाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi