Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टिटवाळ्यात 15 दिवसांचा विशेष ब्लॉक

टिटवाळ्यात 15 दिवसांचा विशेष ब्लॉक

Mumbai Live 3 days ago

ध्य रेल्वेकडून टिटवाळा स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू करण्याच्या तयारीचा हा भाग आहे.

हा विशेष ब्लॉक 28/29 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 1/2 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत , दररोज रात्री 11.30 ते पहाटे 5.10 वाजेपर्यंत असेल.

म्हणजेच सलग पाच रात्री सुमारे 5 तास 40 मिनिटांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

या काळात कल्याण ते वासिंददरम्यान अप आणि डाउन नॉर्थ-ईस्ट मार्गावर विशेष ब्लॉक असेल. त्यामुळे टिटवाळा ते कसारा दरम्यान उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.

28 ऑगस्टच्या रात्री काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

CSMT-टिटवाळा मार्गावरील रात्री 10.00, 10.50 आणि 11.42 वाजताच्या लोकल रद्द राहतील. तसेच CSMT-कसारा 12.08 वाजताची लोकल देखील रद्द असेल.

टिटवाळ्याहून सुटणाऱ्या CSMTच्या रात्री 9.00 आणि 10.06 वाजताच्या लोकल, तसेच टिटवाळा-ठाणे 11.14 वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. आसनगाव-ठाणे 11.08 वाजताची लोकल देखील रद्द असेल.

याशिवाय काही लोकल ठाणे किंवा टिटवाळा येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.

28/29 ऑगस्टच्या रात्री ब्लॉकपूर्वी कसाऱ्यासाठी CSMTहून शेवटची लोकल रात्री 10.47 वाजता सुटेल.

टिटवाळ्यासाठी शेवटची लोकल रात्री 11.16 वाजता सुटेल.

कसाऱ्याहून CSMTसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल रात्री 10 वाजता सुटणार आहे.

ब्लॉकनंतर कसाऱ्यासाठी CSMTहून पहाटे 4.19 वाजता पहिली लोकल सुटेल, तर CSMTसाठी कसाऱ्याहून पहाटे 3.51 वाजता आणि टिटवाळ्याहून 4.32 वाजता पहिली लोकल सुटेल.

29/30 ऑगस्टच्या रात्रीपासून 1/2 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंतही टिटवाळा-कसारा दरम्यान रात्रीच्या ब्लॉकच्या काळात लोकल उपलब्ध राहणार नाहीत.

या काळात अनेक CSMT-टिटवाळा, टिटवाळा-CSMT, टिटवाळा-ठाणे आणि आसनगाव-ठाणे लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, टिटवाळ्याकडे जाणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल आसनगावपर्यंत वाढवण्यात येणार आहेत, तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या सेवांचा उगम आसनगावहून करण्यात येणार आहे.

काही लोकल ठाणेपर्यंत, तर काही कल्याणपर्यंत चालवण्यात येतील.

ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे.

12102 शालीमार-LTT ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, 18030 शालीमार-LTT एक्स्प्रेस, 12810 हावडा-CSMT मेल आणि 15181 मऊ-LTT एक्स्प्रेस या गाड्या सुमारे 10 ते 20 मिनिटे उशिराने धावू शकतात.

तर गोरखपूर-दादर एक्स्प्रेस आणि बलिया-दादर एक्स्प्रेस काही दिवस वासिंद किंवा आटगाव येथे नियंत्रित करण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर टिटवाळा स्थानकावर 15 डब्यांच्या लोकलसाठी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या 15 दिवसांच्या विशेष ब्लॉकच्या पुढील टप्प्यांची माहिती मध्य रेल्वेकडून नंतर जाहीर केली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi