Dailyhunt

Accident News : पिकअप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

ओतूर,प्रतिनिधी:दि ६ एप्रिल [ रमेश तांबे ]

तूर ता.जुन्नर येथील ओतूर- ओझर नारायणगाव मार्गावर धोलवडफाटा येथे दुचाकी व पिकअप वाहनाच्या अपघात दुचाकीवरील एक तरूण जागीच ठार झाला तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

सदर अपघात रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ओतूर -ओझर मार्गावर धोलवड फाट्याजवळ झाला असून, या अपघातात ओंकार गोपाळ कवटे वय.२२ रा.मवेशी, ता.अकोले,जि. अहिल्यानगर हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, या अपघातात सोपान यशवंता लांघी वय २७ हा गंभीर जखमी झाला आहे. आळेफाटा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे.

या अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की ओंकार कवठे व सोपान लांघी हे दोघे दुचाकी (क्र.एम एच १७ डि ऐ ३५२०) या दुचाकीवरून ओतूर पासून पुढे ओझर मार्गे चाकण,पुणे येथे चालले होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धोलवड फाट्याजवळील ‘हॉटेल कोकण पॅलेस’ समोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात पिकअप वाहनाने या तरूणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.ही धडक अत्यंत जोरदार होती.त्या धडकेमुळे दोघेही दुचाकीस्वार दुचाकीवरून रस्त्यावर आपटून रक्तबंबाळ झाले.दुचाकीवरील तरूण अपघातात गंभीर जखमी झाल्याचे पाहून, पिकअप गाडी चालक अपघात स्थळावरून वाहन घेऊन पळून गेला.स्थानिक नागरिकांनी अपघाताचा आवाज आल्यानंतर अपघातस्थळी जाऊन,अपघात ग्रस्त तरूणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

सदर अपघाताबाबत माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नामदेव बांबळे व इतर पोलिस पथकांनी घटनास्थळी जाऊन वाहतुक सुरळीत केली आणि ओतूर ओझर मार्गे नारायणगाव मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अपघात करून फरार झालेली पिकअप गाडीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook