Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Anupam kher : 'मेरे मेहबूब कयामत होगी' गाण्याचा ट्रेण्ड; अनुपम खेर, बमन इराणींची भन्नाट रील तुफान व्हायरल!

खोसला का घोसला २' च्या स्टार्सचा जलवा; अवघ्या काही तासांत रीलला मिळाले शंभर दशलक्षांहून अधिक व्ह्यूज

इन्स्टाग्रामवरील 'रील्स'चा मोह आजकाल कोणाला सुटलेला नाही. कोविड काळात इन्फ्लुएन्सर मिस्टर फैजूने याच 'मेरे मेहबूब कयामत होगी' या गाण्यावर एक रील बनवली होती, जी तुफान व्हायरल झाली आणि तो सोशल मीडिया स्टार बनला.

अलीकडेच जेन-झींच्या आंदोलनादरम्यानही हे गाणे पुन्हा चर्चेत आले होते. आता याच ट्रेण्डमध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही उडी घेतली असून, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून बनवलेली रील इंटरनेटवर खळबळ माजवत आहे.

अनुपम खेर यांचा आगामी चित्रपट 'खोसला का घोसला २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी सहकलाकार बमन इराणी, रणवीर शौरी आणि प्रवीण डबास यांच्यासोबत मिळून या गाण्यावर एक भन्नाट रील तयार केली. ही रील सोशल मीडियावर इतनी वेगाने व्हायरल झाली की, अवघ्या काही तासांतच तिला १०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ही जबरदस्त कामगिरी पाहून अभिनेता रणवीर शौरीने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर अनुपम खेर यांचे आभार मानत, “आम्हाला १०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूजच्या क्लबमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद,” अशी मजेशीर पोस्ट लिहिली आहे. तसेच अनुपम खेर यांनीही रील शेअर करताना, “खोसला आणि खुराना यांचं कधीच पटलं नाही, इथेसुद्धा नाही. जय हो!” असे मजेदार कॅप्शन दिले आहे.

२००६ मधील कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘खोसला का घोसला’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. प्रशांत बांगिया दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, बमन इराणी, रणवीर शौरी, प्रवीण डबास, तारा शर्मा आणि किरण जुनेजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा बहुचर्चित चित्रपट आगामी २८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook