भारतीय तरुणीसोबतच्या रोमान्समुळे चर्चेत आलेला अभिनेता चेंग चांगच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का.
तैवानचा प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल चेंग चांग फॅन (Cheng Chang Fan) सध्या सोशल मीडियावर एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
काही दिवसांपूर्वी त्याने एका भारतीय तरुणीसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये तो तिला मिठी मारताना आणि तिच्यासोबत सुंदर क्षण घालवताना दिसत होता. ही तीच तरुणी असल्याचे बोलले जात होते जिची भेट त्याला २०१५ मध्ये एका भारतीय हॉटेलमध्ये झाली होती. त्या हॉटेलमध्ये या तरुणीने पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळून आणि टिळा लावून त्याचे स्वागत केले होते. या जुन्या भेटीचे रूपांतर पुढे प्रेमात झाल्याचे भासवित चेंगने काही रोमँटिक कॅप्शनसह फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली. भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्याने भारतीय महिलांच्या स्वभावाचे आणि मनातील जिव्हाळ्याचे भरभरून कौतुकही केले होते.
परंतु, या संपूर्ण प्रकरणाला आता एक नाट्यमय आणि थक्क करणारा वळण मिळाला आहे. चेंगचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांनी त्याच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट आणि खात्याची छाननी सुरू केली. यादरम्यान त्याच्या जुन्या पोस्टचे काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत, ज्यानुसार अभिनेता हा समलैंगिक (Gay) असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. या नव्या खुलाशानंतर सोशल मीडियावर एकच संभ्रम निर्माण झाला असून, हा सगळा प्रकार केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा व्ह्यूजसाठी रचलेला एक बनाव तर नव्हे, असा सवाल अनेक युजर्स उपस्थित करत आहेत. जरी या दोघांनी किंवा खुद्द अभिनेत्याने त्यांच्या नात्याबद्दल किंवा या व्हायरल दाव्यांवर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले, तरी या नवीन माहितीमुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे.
