Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Coffee For Dark Cricle : 'कॉफी'च्या चमत्कारी फेसपॅकने चेहऱ्याला येईल इन्स्टंट ग्लो, डार्क सर्कल्सही होतील गायब

अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना असलेल्या कॉफीचे त्वचेसाठी थक्क करणारे फायदे; जाणून घ्या ३ सोपे घरगुती फेसपॅक…

चेहऱ्याची त्वचा निरोगी, चमकदार आणि तजेलदार ठेवण्यासाठी कॉफी हा एक अत्यंत रामबाण आणि नैसर्गिक उपाय मानला जातो.

कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि कॅफीन त्वचेच्या अनेक गंभीर समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात, जे त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) काढून टाकून चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणतात. याशिवाय, यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होतो, तर कॅफीनमुळे डोळ्यांखालील सूज आणि डार्क सर्कल्सची समस्या नाहीशी होते. जर तुम्हाला त्वचा टाईट करायची असेल किंवा उन्हामुळे झालेले टॅनिंग घालवायचे असेल, तर कॉफीचा वापर सर्वोत्तम ठरतो.

हा ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही घरातच ३ सोपे फेसपॅक तयार करू शकता. पहिला म्हणजे, त्वचा चमकदार करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी १ ते २ चमचे कॉफीमध्ये २ चमचे दही आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. दुसरा उपाय म्हणजे, त्वचा सैल पडू नये म्हणून १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा मध आणि १ चमचा दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तर तिसरा अगदी सोपा उपाय म्हणजे, २ चमचे कॉफीमध्ये १ चमचा कच्चे दूध मिक्स करून लावल्यास त्वचेच्या अनेक समस्या झटक्यात दूर होतात. कॉफीच्या या सोप्या घरगुती उपायांमुळे महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सशिवाय तुम्हाला घरच्या घरीच फेशिअलसारखा ग्लो मिळू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook