Dailyhunt

Hingoli News : हिंगोलीत अवकाळी पावसाचा कहर; गारपीटीमुळे कोबीसह अनेक पिकांचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांत तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हातात आलेली पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

महाराष्ट्रामधील मधील इतर भागांप्रमाणेच हिंगोलीतही या अनियमित हवामानाचा मोठा फटका बसला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी कठीण बनली आहे.

विशेषतः कोबीच्या पिकावर मोठा खर्च करून लागवड करण्यात आली होती. मात्र सलग तीन दिवस पडलेल्या पावसासोबत झालेल्या गारपीटीमुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. यावर्षी चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत.

पिकांचे नुकसान इतके मोठे आहे की, काही शेतकऱ्यांकडे कापणीसाठीही पैसे उरलेले नाहीत. परिणामी, कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook