Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Kolhapur Cyber Police : कोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; तब्बल १ कोटींचे ४१० हरवलेले मोबाईल जप्त करून मालकांना परत

र्दीच्या ठिकाणी, रेल्वे, बसस्थानक किंवा धार्मिक स्थळांवर प्रवाशांना गंडा घालून मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळत कोल्हापूर सायबर पोलिसांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता नगण्य असते, हा लोकांचा समज या कारवाईने पूर्णपणे खोडून काढला आहे.

कोल्हापूर सायबर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तब्बल १ कोटी रुपयांमूल्याची ४१० मोबाईल संच हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. केवळ मोबाईल जप्त करून न थांबता, पोलिसांनी ज्या नागरिकांनी हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या, त्यांना बोलावून हे सर्व फोन अत्यंत आनंदाच्या वातावरणात त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात १ हजारांहून अधिक मोबाईल शोधून ते त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवले गेले आहेत, जी राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या जप्त केलेल्या स्मार्टफोन्समध्ये तब्बल १२ आयफोनचा समावेश असून, त्यांची किंमत ५० हजारांपासून लाखांच्या घरात आहे. इतका महागडा गॅझेट गेल्यामुळे ज्या मालकांची झोप उडाली होती, ते मोबाईल पुन्हा हातात पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि हसू फुलले होते. विशेष म्हणजे, हे मोबाईल शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा या शेजारील राज्यांतूनही कसून तपास करत ते जप्त केले आहेत. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते हे मोबाईल मालकांना परत करण्यात आले असून, सायबर पोलिसांच्या या तत्परतेबद्दल सर्वसामान्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook