Dailyhunt

Sharad Pawar : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवार काय म्हणाले?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिकच सक्रिय झाले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

सत्ताधारी पक्षांकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, बारामतीत विविध पक्षांची हालचाल वाढली आहे.

दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट मत मांडले. त्यांनी सांगितले की, कोणतीही निवडणूक लढवताना प्रतिस्पर्धी उमेदवार असणारच, हे गृहित धरूनच राजकीय पक्षांनी मैदानात उतरले पाहिजे.

महाविकास आघाडीचा पाठिंबा मागूनही काँग्रेसने स्वतःचा उमेदवार उभा केल्याबाबत विचारले असता, त्यांनी याला स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णय मानले. हा मुद्दा राज्यस्तरीय नसून, प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook