Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ! उदयनिधी स्टालिन यांच्या त्रिशा कृष्णनवरील वादग्रस्त टिप्पणीमुळे गदारोळ

गायिका चिन्मयी श्रीपदा आणि अभिनेत्री खुशबू सुंदर आक्रमक; स्टालिन यांच्या विरोधात निषेधाचा सूर

तामिळनाडूच्या राजकारणात एका वादग्रस्त विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील नेते उदयनिधी स्टालिन यांनी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबद्दल एक अत्यंत अपमानास्पद आणि वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संतापाची लाट पसरली आहे.

या प्रकरणावर दाक्षिणात्य अभिनेत्री आणि गायिका उघडपणे पुढे आल्या असून त्यांनी स्टालिन यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

कावेरी नदीच्या मुद्यावरून आणि राजकीय घडामोडींदरम्यान आयोजित एका कार्यक्रमात उदयनिधी स्टालिन हे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना लक्ष्य करत होते. यादरम्यान जमलेल्या गर्दीतून अचानक 'तृषा, तृषा' अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली. हे ऐकून स्टालिन आधी हसले आणि नंतर त्यांनी त्रिशाबद्दल एक अश्लील व डबल मिनिंग टिप्पणी केली. हा प्रकार सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

चिन्मयीने एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या संताप व्यक्त केला. सुरुवातीला आपल्याला स्टालिन यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, परंतु नंतर त्यातला अश्लील संदर्भ लक्षात आल्याचे तिने म्हटले. राजकीय लढाईत राजकारणाशी संबंध नसलेल्या महिलांना ओढणे चुकीचे असून, उदयनिधीने जमावाला शांत करण्याऐवजी स्वतःच अशी भाषा वापरणे निंदनीय असल्याचे चिन्मयी म्हणाली. नव्या पिढीकडून अशा निकृष्ट भाषेची अपेक्षा नव्हती, असेही तिने सुनावले. भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनीही उदयनिधी स्टालिन यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांची टिप्पणी अत्यंत घाणेरडी आणि अपमानस्पद असल्याचे सांगत खुशबू म्हणाल्या की, अशा भाषेला समाजात थारा दिला, तर आपल्या कुटुंबातील महिला सुरक्षित राहणार नाहीत. सार्वजनिक जीवनात भाषेची एक मर्यादा असलीच पाहिजे. राजकारणात महिलांना मोहरा बनवून असे उद्योग करणे अयोग्य असून, स्टालिन यांनी आपल्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल त्रिशाची तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा आणि राजकीय नेत्यांच्या भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सर्वच स्तरातून उदयनिधी स्टालिन यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook