Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Vijay Mallya Slams : २२,००६ कोटींचे कर्ज अवघ्या ६.५ कोटींत साफ! झीचे संस्थापक सुभाष चंद्र यांच्या कर्जमाफीवर विजय माल्या अन् जयराम रमेश संतापले

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLT) एस्सेल ग्रुपचे प्रमुख सुभाष चंद्र यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून, विजय माल्या आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

एस्सेल ग्रुप आणि झी एंटरटेन्मेंटचे संस्थापक सुभाष चंद्र यांना आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थक्क करणारी कर्जमाफी मिळाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLT) सुभाष चंद्र यांच्यावरील तब्बल २२,००६ कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज अवघ्या ६.५ कोटी रुपयांमध्ये मंजूर करून रफादफा केले आहे. या निर्णयामुळे बँकिंग आणि कॉर्पोरेट जगतात एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. या तडजोडीमुळे बँकांना तब्बल ९९.९ टक्क्यांहून अधिकचे नुकसान सोसावे लागणार असून, बँकांच्या हाती केवळ ०.०३ टक्के रक्कम पडणार आहे.

सुरुवातीला या प्रस्तावावर NCLT च्या न्यायाधीशांमध्ये मतभेद होते, जिथे एक न्यायाधीश बाजूने तर दुसरे विरोधात होते. त्यामुळे तिसरे न्यायाधीश निलेश शर्मा यांच्याकडे हा निर्णय सोपवण्यात आला आणि त्यांनी सुभाष चंद्र यांच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव अधिकृतपणे मंजूर झाला. एलआयसी हाऊसिंग, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक यांसारख्या प्रमुख बँकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. परंतु, ८० टक्क्यांहून अधिक कर्जदात्यांची मंजुरी मिळाल्यामुळे अल्पमतात असणाऱ्या इतर बँकांना हा निर्णय नाइिलाजाने स्वीकारावा लागला.

या बुचकळ्यात टाकणाऱ्या निर्णयानंतर फरार उद्योगपती विजय माल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत खोचक टोला लगावला आहे. “जर ही बातमी खरी असेल तर माझे मित्र सुभाष यांचे खूप खूप अभिनंदन! माझ्या बाबतीत बँकांनी हजारो कोटींची वसुली double केली, पण इथे मोठ्या कर्जदारांची प्रकरणे केवळ काही रुपयांत मिटवली जातात. भारतात न्यायाचा हा नवीन मार्ग आहे,” असे म्हणत त्याने माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. याशिवाय, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत, हा केवळ ‘हेअरकट’ नसून थेट ‘मुंडन’ आहे आणि यामुळे दिवाळखोरी कायद्याची खिल्ली उडवली गेली आहे, अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook