Dailyhunt

Zeeshan Siddiqui : राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

सुनेत्रा पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा युवा नेतृत्वावर विश्वास

अनेक दिवसांच्या सस्पेन्सवर पडदा टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, आज सकाळी ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या उमेदवारीसाठी पक्षात अनेक अनुभवी नेते इच्छुक असतानाही, सिद्धीकी यांच्या युवा आणि आक्रमक नेतृत्वाला वरिष्ठ नेत्यांनी पसंती दिली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावूक झालेल्या झिशान सिद्धीकी यांनी, “माझ्यासारख्या तरुणाला संधी दिल्याबद्दल मी सुनेत्रा पवार आणि अजित दादांचा अत्यंत ऋणी आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, पक्षासोबत जास्तीत जास्त युवकांना जोडणे आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांनी आपले वडील (दिवंगत बाबा सिद्धीकी) आणि अजित पवार यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली असून, संपूर्ण देशात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook