Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समीर वानखेडेंच्या चौकशीचे विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

समीर वानखेडेंच्या चौकशीचे विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचीच आता चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी एक टीम स्थापन केलीय.

मुंबई पोलिसांचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंबंधीचा आदेश काढलाय. वानखेडेंच्या प्रकरणात नांगरे पाटलांची एंट्री झालीय. गेल्या २ ऑक्टोबरला क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाली. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. पण या कारवाईनंतरच वानखेडेंवर वेगवेगळे आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रभाकर साईलने तर २५ कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोपही केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MumbaiTak