Wednesday, 15 Sep, 8.13 pm मुंबई तक

ताज्या बातम्या
डोंबिवली : बेरोजगार इसमाच्या खुनाप्रकरणी चौघांना अटक

काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याचं मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. वाहतूक पोलिसांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी व्यक्तीला डोंबिवलीतील एका हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

हातावर व डोक्यावर जबर मारहाण केल्याने उपचार दरम्यान त्याचा मृत्य झाला. त्यामुळे मानपाडा पोलिसांकडून ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे नसतानाही मानपाडा पोलिसांनी केवळ एका कॉलच्या सहाय्याने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

११ सप्टेंबरला दुपारी १२ च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी.एस.होरे याना आढळून आले होते. कृष्णमोहन तिवारी असं या व्यक्तीचे नाव असून रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे असणाऱ्या आधारकार्डवरून त्यांचे नाव आणि घराचा पत्ता मिळवत मानपाडा पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत पोलिसांना विशेष असं काहीच आढळून आले नाही.

परंतू त्यांच्या मुलीने सकाळी १०.३० च्या सुमारास एक फोन आला आणि त्यानंतर बाबा घराबाहेर पडले अशी जुजबी माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात जाऊन तपास करत या सर्व प्रकरणाचा उलगडा केला.

कृष्णकुमार हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि लॉकडाऊनमूळे त्याची कतारमधील नोकरी गमावल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका प्लेसमेंट सेंटरकडे त्याने आपली माहिती दिली होती. या प्लेसमेंट सेंटरमधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने त्याला मोबाईलवर संपर्क केला आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले. त्यानंतर रिहानने साथीदार सागर पोन्नाल आणि सुमित सोनावणे यांच्या मदतीने कृष्णकुमारला रिक्षेत बसवत लूटमार करत त्याचा खून केल्याची माहिती कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली. रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MumbaiTak
Top