फॅशन जगातील सर्वात मोठा मेट गाला यावर्षीही कलाकारांची हटके फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चत आहे. या भव्य कार्यक्रमात जगभरातील मोठमोठ्या स्टार्सननी उपस्थिती दर्शवली. याच मेट गालात यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ईशा अंबानीने आपल्या हटके फॅशन सेन्सने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.
ईशाचा संपूर्ण लूक हा भारतीय परंपरा आणि शाही वारसाचा उत्तम संगम होता. पाहूयात ईशा अंबानीची मेट गालातील एन्ट्री करताना काय परिधान केलं होतं.
सोन्याची साडी
ईशा अंबानीने या सोहळ्यासाठी प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केलेली साडी नेसली होती. ही साडी शुद्ध सोन्याच्या धाग्यांनी विणलेली होती. ही साडी तयार करण्यासाटी 50 पेक्षा जास्त कामगार लागले तर साडी विणायला 1200 तास मेहनत घेण्यात आली आहे.
साडीवर ईशाने डायमंड ब्लाउज घातला होता. या ब्लाउजमध्ये 1800 कॅरेटपेक्षा जास्त हिरे, पन्ना, पोल्की आणि कुंदन जडवण्यात आले होते. ब्लाउजविषयी खास सांगायचे झाल्यास ईशाची आई नीता अंबानी यांच्या ज्वेलरी कलेक्शनमधून हे तयार करण्यात आलं आहे. या ब्लाउजवर हैदराबादच्या निजामांच्या ऐतिहासिक 'सरपेच' दागिन्याचा वापर करण्यात आला.
मोगऱ्याचा गजरा
ईशाच्या केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांपासून प्रेरित एक हेअर स्कल्पचर वापरण्यात आले. हे पारंपरिक मोगऱ्याच्या गजऱ्याचे एक आधुनिक रुप होते. कागद, तांबे आणि पितळ यांचा वापर करून हे हाताने तयार करण्यात आलंय.
आंब्याची बॅग
मेट गालात ईशा अंबानीने हातात आंब्याची बॅग घेऊन एन्ट्री केली. या जाळीदान बॅगेत आंब्याचे शिल्प ठेवण्यात आले होते.
सोन्याची साडी, हिऱ्यांनी सजलेला ब्लाउज आणि हातात नैसर्गिक घटक आंबा, या कॉन्ट्रास्टमुळे ईशाचा लूक मेट गालामध्ये लक्षवेधी बनला.

